पी/उत्तर वार्ड सार्वजनिक चर्चा की चिंतन बैठक

सूर्यकांत मोरे

दिनांक: २२/२/२०१४

पी/ उत्तर विभाग मालवणी – मालाड (प.)

बुद्ध विहार संस्कार केंद्र मालवणी – मालाड (प.) ह्या ठिकाणी पी/उत्तर विभाग समिति आणि हमारा शहर, हमारा विकास, हमारा नियोजन अभियान चे कार्यकर्ते सोबत दुपारी २ वा. बैठक झाली. त्या बैठकी मध्ये हमारा शहर, हमारा विकास, हमारा नियोजन अभियान च्या आता पर्यतच्या कामाच्या आढावा बाबत मोहन चव्हाण यांनी सखोल सहरूपात माहिती दिली.

त्यानंतर अरविंद उन्नी यांनी डी. पी. च्या संदर्भात पी/ उत्तर च्या वस्ती विकास नियोजन आराखडा संदर्भात व डी. पी. अंतर्गत जमीनीच्या संदर्भात B.M.C. ने केलेल्या चुका आणि आपण त्यांना निर्देशनात आनून दिलेल्या चुका व सुघारणा करण्यासाठी भाग पाडलेल्या चुका संदर्भात माहिती दिली. तसेच पी/उत्तर च्या आरक्षित जमीनी बाबत माहिती दिली. व सरकारने ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या जागा ई. एल. यू. नक्शा मध्ये ती जागा स्लम क्लस्टर दाखविन्यात आल्या आहेत असे सांगितेल. तसेच आपल्या मुंबई स्तरावर वस्ती विकास नियोजन आराखडा मध्ये प्रमुख मांगण्या संदर्भात माहिती दिली. तसेच पी/उत्तर विभाग मध्ये B.M.C. अंतर्गत वार्ड स्तरावर बैठक होणार आहे तेव्हा प्रमुख मांगण्या आपण लिखित सरकारला दिल्या पाहिजे त्यासाठी संगठीत होऊन नेतत्व करण्यास सांगितले व त्यासाठी मार्गदर्शन केले.

त्यानंतर श्वेता आणि हुसैन कमला रहेजाचे प्राध्यापक हे पी/उत्तरचे मॉडेल प्लान तैयार करत आहेत. युवा अंतर्गत त्याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच पी/उत्तर मध्ये खाली ओपेन स्पेस किती आहेत व त्यावर सध्याची काय स्तिति आहे त्याबाबत पी/उत्तर ई. एल. यू. नकाशा दर्शवून माहिती दिली.  

त्यानंतर हमारा शहर, हमारा विकास, हमारा नियोजन अभियानचे सामाजिक कार्यकर्ते राजगुरू व चंद्रशेखर यानी सांगितले की संगठने च्या माध्यमातून सरकारला प्रमुख मांगण्या लिखित स्वरूपात दिल्या पाहिजेत आणि आपले अधिकार लोक सहभागाचा माध्यमातून प्राप्त करून घेतले पाहिजे. सूर्यकांत मोरे यांनी पी/उत्तर विभाग समिती ने डी. पी. संदर्भात प्रमुख मांगण्याची अमलता करण्या साठी पी/उत्तर विभाग समिती ने नेतृत्व केले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रमुख पी/उत्तर च्या कार्यकर्ता सोबत प्रमुख मांगण्या साठी बैठक आयोजित करण्याचा ठराव केला. सुमती बेलाडी यांनी उपस्थित लोकांचे आभार व्यक्त करून बैठक समाप्त केली.